हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाउनला अडीच महिन्यांहून अधिक काळ झाला असून सर्व उद्योगांबरोबरच क्रिकेटही बंद पडलेले आहे. यावेळी सगळे क्रिकेटपटू त्यांच्या घरीच आहेत. याचवेळी विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासह त्याच्या घरीच थांबलेला आहे.
या लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने घरातच बसून साडेतीन कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विराट कोहलीने केवळ इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एवढी कमाई केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टवरुन कमाई करणाऱ्या स्पोर्ट्स पर्सनमध्ये विराट कोहली सहाव्या क्रमांकावर असून यामध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
लॉकडाऊन दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीन स्पॉन्सर इन्स्टाग्राम पोस्ट केले आहेत. विराट कोहलीच्या त्या प्रत्येक पोस्टची सरासरी कमाई ही १ कोटी २० लाख रुपये इतकी आहे, त्यामुळे कोहलीची एकूण कमाई ही ३ कोटी ६० लाख रुपये झाली आहे.
विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत, त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या जवळपास ६ कोटी २० लाख आहे. इन्स्टाग्राम पोस्टवरून कमाईच्या बाबतीत विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे, तर टॉप फाइव्हमध्ये ४ फुटबॉलर्स आहेत.
जगातील प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, जगभरात क्रिस्टियानो रोनाल्डोच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ही सर्वाधिक आहे. रोनाल्डोचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स २२.२ दशलक्ष आहेत. या लॉकडाऊनमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने इन्स्टाग्राम पोस्टवरुन सुमारे १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
इन्स्टाग्रामकडून मिळणार्या कमाईच्या बाबतीत पहिल्या ५ खेळाडूंपैकी फक्त एक बास्केटबॉल खेळाडू आहेत, तर उर्वरित ४ हे फुटबॉलपटू आहेत. या यादीत पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आहे. या यादीमध्ये मेस्सी (१२ कोटी ३० लाख) दुसर्या तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार (११ कोटी ४०लाख) तिसर्या स्थानावर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.