हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीम इंडियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार असलेला विराट कोहलीचा आज वाढदिवस. विराट आज 34 वर्षांचा झाला असून तो सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियात आहे जिथे टी-20 विश्वचषक 2022 खेळला जात आहे. विराटला वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले असले तरी विराटला अनुष्का शर्मा ऐवजी बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आवडायची. याबाबत त्याने एका मुलाखतीत आपली लहानपणाच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल खुलासा केला आहे.
अनेक क्रिकेटरांना बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आवडत असते. अशात विराटचाही सहभाग आहे. त्याने तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काशीच विवाह केला. अनुष्काबरोबर लग्न करण्याअगोदर कोण अभिनेत्री आवडायची याबाबत एका मुलाखतीतीत विराटला प्रश्न विचारला असता त्याने लहान वयात असताना करिश्मा कपूर आवडायची असे उत्तर दिले. मात्र, विराटने 2017 मध्ये अनुष्का शर्मासोबत लग्न केले. या जोडप्याला वामिका नावाची मुलगी आहे. वामिकाचा जन्म गेल्या वर्षी 11 जानेवारीला झाला होता.
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत झाला. विराटच्या वडिलांचे नाव प्रेमजी कोहली आणि आईचे नाव सरोज आहे. विराट कोहलीचे शिक्षण विशाल भारती स्कूलमधून झाले आहे. विराटचे वडील प्रेमजी हे वकील होते आणि डिसेंबर 2006 मध्ये त्यांचे निधन झाले. विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो दिल्लीकडून रणजी सामना खेळत होता. वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही विराट कोहलीने आपला संघ सोडला नाही.
विराटचे इन्स्टाग्रामवर किती आहेत फॉलोअर्स?
विराटचे इन्स्टाग्रामवर 220 मिलियन फॉलोअर्स आहे, त्याची त्यावरुनही मोठी कमाई होते. इंस्टाग्रामवरील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत त्याचा समावेश होतो. लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यानंतर इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला स्पोर्ट्स सेलिब्रिटींच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. हूपर एचक्यू 2022 इंस्टाग्राम रिच लिस्ट मध्ये टॉप-20 मध्ये भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा नंतर विराट कोहली एकमेव आशियाई आहे. यानुसार कोहली त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये मिळतात.
अशी आहे विराटची क्रिकेट कारकीर्द –
कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 27 शतके आणि 28 अर्धशतकांसह 8074 धावा आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतके आणि 64 अर्धशतकांसह एकूण 12344 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि 36 अर्धशतकं लगावत एकूण 3932 धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहलीने आयपीएलमध्ये 223 सामन्यांत 5 शतके आणि 44 अर्धशतके झळकावताना 6624 धावा केल्या आहेत.