आता श्रीलंकेला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सर्वांचेच स्वप्न असते परदेश दौरा करण्याचे. त्यासाठी अनेकजण अनेक दिवसापासून तयारी करत असतात. सर्व तयारी होऊन गाडी येऊन थांबते ती व्हिसावर. व्हिसा मान्य झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याच देशाची वारी करू शकत नाही. परंतु आता ते शक्य होणार आहे. कारण आपल्याला शेजारील देश म्हणजे श्रीलंकेला तुम्ही विना व्हिसाचा प्रवास करू शकता. ते कस ते जाणून घेऊ.

मंत्रिमंडळाने घेतला निर्णय

श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने श्रीलंकेत भारतासह अन्य सहा देशांना श्रीलंकेत मोफत व्हिसा देण्याची स्कीम काढली आहे. त्याला देशातील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.श्रीलंकेच्या ह्या स्कीममध्ये भारत, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, जपान, थायलंड आणि रशियासारख्या देशातील नागरिकांना श्रीलंकेत जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता लागणार नाही.

कधीपर्यंत असेल ही स्कीम?

मोफत व्हिसा देण्याच्या निर्णयामुळे सर्व अंतराराष्ट्रीय प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत. आता ही योजना कधी सुरु होते. ह्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत देशाचे पराष्ट्रीय मंत्री अली साबरी ह्यांनी एका निवेदनात म्हंटले की, ही स्कीम 31 मार्च 2024 पर्यंत पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाईल. म्हणजेच तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता.

भारत हा आमच्या धोरणात महत्वाचा आहे – अली साबार

भारत आणि श्रीलंका हे दोन दश शेजारील देश आहेत. परराष्ट्रीय मंत्री साबरी म्हणाले की, “भारताचे आमच्या देशाशी असलेले संबंध हे आमच्या परराष्ट्रीय धोरणात सर्वात महत्वाचे आहे. तसेच भारत हा ऐतिहासिक दृष्ट्या आमच्या देशासी जोडला गेले असल्यामुळे तो अंतर्गत पर्यटनाचा मुख्य स्रोत मानला जातो”. असं त्यांनी सांगितलं.

श्रीलंका करतेय राजकीय गोंधळाचा सामना

श्रीलंकेत मागच्या काही महिन्यांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. देशाचे सध्याचे राष्ट्रपती राजपक्षे ह्यांच्या राजीनाम्याची मागणी ही चांगलीच जोर धरतेय. आणि त्यामुळे श्रीलंका कुठेतरी राजकीय तेढात अडकलेली दिसून येते.