आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश जोंधळे 

 

खासदार संजय पाटील म्हणतात “माझी संग बघितली, आता जंग बघा”, मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. जंग करायला आम्ही घाबरत नाही. तासगावमध्ये येऊन तुमची गुंडगिरी मोडू काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे खासदार संजय पाटील यांना दिला आहे . तर झाल्या गेल्या चुका माफ करून जयंत पाटील, विश्वजीत कदम व सुमनताई पाटील यांनी साथ द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

सांगलीतल्या स्टेशन चौकात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, खासदारांना दादागिरी आणि गुंडगिरी करायला सांगलीकरांनी निवडून दिले नाही. मला म्हणतात, आता माझा जंग बघा, कंबरेला बंदूक लावून फिरले म्हणजे माणूस धाडसी होत नाही. तासगावात आ.सुमनताई पाटील यांना घरात कोंडून दगडफेक केली म्हणजे मर्दानगी सिध्द होत नाही. जंगाला आम्ही घाबरत नाही. तासगावात येऊन तुमची दादागिरी मोडून काढू असे विशाल पाटील संजय पाटील यांना उद्देशून म्हणाले आहेत.

 

सांगलीत फक्त वसंतदादांच्या प्रेमाचीच दादागिरी चालते, भाजपने माझ्या आडवे येऊ नये. हातात बॅट आहे, त्यामुळे या निवडणुकीत छक्केच मारणारच असल्याचे विशाल पाटील यांनी म्हणले आहे. अंगात दादांचे रक्त आहे. त्यामुळे थोडेफार असे होते. मात्र आता वसंतदादा-राजारामबापू पाटील वाद मिटला पाहिजे. काही चुकल असेल तर समजावून घ्यावे. खा.शेट्टी यांनीसमजून घेतले आहे. जयंत पाटील, विश्वजीत कदम व सुमनाताई पाटील यांनी देखील समजावून घ्यावे. मला मदत करावी तुम्ही दादा घराण्यावर केलेले प्रेम वाया जाणार नाही, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला.