मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 14, 2020
महानगरपालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.