सतर्क रहे, सुरक्षित रहे ; कोरोनाला रोखण्यासाठी शरद पवारांनी दिला कानमंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेची चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखायच असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणेबंधनकारक आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सर्वसामान्यांना देत पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी सांगितले आहे.सतर्क रहे, सुरक्षित रहे असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केलं आहे. यात शरद पवारांनी असं म्हटलं आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय’. असं कॅप्शन देत शरद पवारांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत नमुद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6100 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात आढळून आलेले नवीन कोरोना रुग्ण हे गेल्या 84 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण आहेत. तर गेल्या चोविस तासातील मृतांची आकडेवारी ही 15 दिवसातील सर्वाधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment