धुळे | मयताच्या टाळूवरील लोणी खाणारे लोक आत्तापर्यंत आपण पाहत आलो आहोत. लोकांच्या संवेदना कुठे जातात हे कळणे हि आता खूप अवघड झाले आहे. अशातच, असे काही दृश्य समोर येते त्यावर की ते पाहून मानवतेवरचा विश्वासही कमी होतो. अशीच एक घटना धुळ्यामधील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. येथील हॉस्पिटलमध्ये करोणा रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या खिशातील रक्कम ही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची बॉडी प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक करताना काढून घेतल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
धुळ्यामधील श्री गणेशा माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ही घटना असून या घटनेमध्ये मृताच्या खिशातून चार वॉर्डबॉयने पैसे काढून घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मानवतेला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व रुग्णालय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
https://youtu.be/iZjXFLiFGdw
धुलिया पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘दीपक रमेश पाटील नावाच्या इसमाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांच्या मित्राला 29 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यावेळी त्यांच्या खिशात एक लाख रुपये होते. हॉस्पिटलचे बिल 65 हजार रुपये झाले. त्यामुळे त्यांच्या खिशात 35 हजार रुपये शिल्लक होते. ते पस्तीस हजार रुपये हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयने मिळून काढून घेतले. सीसीटीव्ही विडिओ पाहिल्यानंतर दृश्यांमध्ये तसे दिसून येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.