आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड

netflix
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात घरबसल्या वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी लोकांकडून OTT प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो आहे. आजकाल यासाठी Netflix, Amazon Prime, Sony Liv, Disney + Hotstar सारखे OTT प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध झाले आहेत. यावर आता लोकं सहसा टीव्ही सिरिअल्स आणि चित्रपट पाहत आहेत. यासाठी ग्राहकांना त्याचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. यामध्ये काही कंपन्यांच्या किंमती कमी आहेत. मात्र, Netflix सारख्या OTT प्लॅटफॉर्मची किंमत इतरांपेक्षा जरा जास्त आहे. यामुळे, इच्छा असूनही लोकं त्याचे सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी करत नाहीत.

मात्र जर आपल्याला हे सबस्क्रिप्शन पैसे न भरता घेता आले तर ??? होय हे अगदी खरे आहे. आज आपण एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅन बाबत चर्चा करणार आहोत, ज्याअंतर्गत ग्राहकांना नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल…

एअरटेल हा 1,199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन आहे. याची खास बाब अशी कि, यामध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Netflix चे सबस्क्रिप्शन दिले जाते. म्हणजेच नेटफ्लिक्स पाहण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

यासोबतच Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. इतकेच नाही तर यामध्ये ग्राहकांना 3 फ्री फॅमिली एड-ऑन दिले जाते. या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसचा लाभही दिला जातो आहे. याशिवाय, रोलओव्हरसहीत 150GB डेटा देखील मिळेल.

त्याचप्रमाणे Airtel कडून 999 रुपयांचा प्लॅनसुद्धा ऑफर केला जातो आहे. यामध्ये ग्राहकांना रोलओव्हर म्हणून 100GB डेटा मिळतो. तसेच यामध्येही ग्राहकांना Amazon Prime आणि Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. मात्र यामध्ये Netflix उपलब्ध नाही. तसेच यामध्ये 2 फ्री फॅमिली एड ऑन प्लॅन उपलब्ध असतील. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online

हे पण वाचा :
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर