मुंबई । उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागल्याचंही राऊत म्हणाले.
दरम्यान, आज शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन. राज्यात तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे आणि खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदावर विराजमान असले तरी कोरोना संकटामुळे यावर्षी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा जल्लोष नसेल. त्याऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत, असं आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”