सोपलांना बाळासाहेब ठाकरेंनी धूळ चरायला सांगितली होती ती आम्ही चारणार ; नाराज शिवसेना नेत्यांचा पक्षासोबत असहकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर नाराज असणाऱ्या भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलीप सोपल यांचे काम करणार नाही असे म्हणत त्यांचा आम्ही पराभव घडवून आणणार असे म्हणले आहे.

“मी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन राजकरणात आलो. शिवसेनेचा भगवा खांदयावर घेतला. गेल्या काही वर्षात तालुक्‍यात शिवसेनेच्या शाखा काढल्या. मोर्चे काढले, आंदोलने केली. शिवसेना तळागाळात रुजावी म्हणून खूप मेहनत घेतली. शिवसेनेत काम करताना विरोधकांनी खूप त्रास दिला. खोटया केसेसमध्ये अडकवले.तरीही आम्ही शिवसेनेचा भगवा सोडला नाही. माझे पक्षामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले पण पक्ष सोडायचा विचार केला केला नाही .” अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केली आहे.

जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाहीत ते शिवसेनेचे काय होणार असा सवाल करून भाऊसाहेब आंधळकर यांनी दिलीप सोपल हे सत्तेकडे पक्षांतर करतात असे म्हणले आहे. त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीप सोपल यांना धूळ चारा असे म्हणले होते. ते काम आम्ही आता करून दाखवणार असे भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हणले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीच असा असहकार पुकारल्याने शिवसेनेला आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.