आयपीएल 2022 मध्ये धोनी चेन्नईच्या संघात असणार का? संघाने दिली ‘ही’ मोठी अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुढील वर्षीच्या आयपीएल पूर्वी खेळाडूंचा एक मोठा लिलाव होणार असून दोन नवीन संघ देखील आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. अशा स्थितीत सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची नव्याने निवड करावी लागेल. त्याचबरोबर त्याला काही खेळाडूंना कायम ठेवण्याचीही संधी मिळणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 साठी सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या लिलावात पहिले रिटेन्शन कार्ड फक्त धोनीसाठी वापरले जाईल, असे सीएसकेने स्पष्ट केलं आहे.

सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, “खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल हे खरे आहे, पण किती खेळाडूंना कायम ठेवता येईल, याबाबत काही ठरलेले नाहीय. खरं सांगायचं झालं तर रिटेन्शनची प्रक्रियेचा धोनीवर काही परिणाम होणार नाही. त्याच्यासाठी ही दुय्यम गोष्ट असेल. आम्ही त्याच्यासाठी आमचे पहिले रिटेन्शन कार्ड वापरू. सीएसकेला त्यांच्या कर्णधाराची गरज आहे आणि तो पुढच्या वर्षी खेळेल, याचाही हा पुरावा आहे.”

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी प्रथम आयपीएल पासून चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला हरवून चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली ही चारही जेतेपदे चेन्नईने जिंकली आहेत. धोनीने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ चे विजेतेपद पटकावले आहे.

Leave a Comment