हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
दरम्यान सरकारकडून काही प्रमुख निर्बंध लादण्यात आले आहेत उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
पहा नक्की काय सुरू राहणार आणि काय बंद
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी राहणार
गृहनिर्माणची सर्व कामे सुरू
भाजी मंडई बंद राहणार
बार हॉटेल मॉल बंद राहणार
सर्व मैदाने आणि सभागृह बंद राहणार
ऑफिस50 % क्षमतेने सुरू
सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
उद्याने समुद्रकिनारे चित्रपटगृह बंद
दुकान आणि हॉटेल मध्ये पार्सल सेवा सुरू राहणार
रिक्षा टॅक्सी खाजगी बसेस सुरू राहणार
मुंबई लोकल वाहतूक सुरू राहणार
सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page