ममता बॅनर्जी वाघीण; पश्चिम बंगालची निवडणूकच देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भाजपने जरी पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असली तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ममता बॅनर्जी याही एकटी वाघीण आहे. आणि हि वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या हालचालीकडे संबंध देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण येथील निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होणार आहेत,असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तविले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले कि, गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली कि, महाभारताचे युद्ध २१ दिवसांत संपले पण कोरोनाचा १८ दिवसांत अंत होईल, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. पण आज वर्ष उलटून गेल्यानंतरही कोरोना कायम आहे. त्यामुळे मोदी सरकारला कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकता आलेले नाही. कोरोनाला हरवता न आलेले मोदी सरकार आता पश्चिम बंगामध्ये ममतांच्या पराभवासाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नवं महाभारत घडत आहे, असा टोला संजय राऊत यांनी मोदींना लगावला.

निवडणुकीबाबत दावा करताना राऊत म्हणाले कि, पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होईल. देशातील लोकशाहीवर आजपर्यंत नेहमीच आघात झाले. प्रत्येकवेळी लोक त्याविरुद्ध लढले. त्यामुळेच आज देशातील लोकशाही जिवंत आहे,
पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये 30 मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये नंदीग्राम मतदारसंघाचाही समावेश आहे. या एका मतदारसंघात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या 22 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बुथवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे.

Leave a Comment