मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. तसेच महाविकास आघाडीतील असलेले घटकपक्षही शिवसेनेवर दबाव निर्माण करत आहेत. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
नितेश राणेंनी ट्विटवर ट्विट करत शक्ती कायद्यावरून महाविकास आघाडीच्या भूमिकेवर टीका केलीय. ”जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?,”असं म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केलाय.
जे दिशा बरोबर झाले..
तेच पुजा बरोबर होणार असेल..
तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही?
— nitesh rane (@NiteshNRane) February 12, 2021
तर दुसरीकडे भाजप नेते निलेश राणेंनीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे, असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 12, 2021
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.