हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे सर्वांत महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असो या सर्व कामांसाठीआधार कार्ड खूप महत्त्वाचे बनले आहे. आधार कार्डमधील फसवणुकीच्या घटनांमध्येही सध्या वाढ होते आहे. अनेकवेळा लोकं याद्वारे होणाऱ्या फसवणुकीला देखील बळी पडत आहेत.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने फसवणूक टाळण्यासाठी सरकारने मास्क्ड आधार सुरू केले आहे. या Aadhar Card च्या मदतीने लोकांचे कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून संरक्षण होते.
मास्क्ड Aadhar Card म्हणजे काय ???
मास्क्ड आधार कार्ड ID मध्ये सामान्य आधार कार्डप्रमाणे सर्व क्रमांक दिसत नाहीत. यामध्ये फक्त शेवटचे 4 अंकच दिसतात. मास्क्ड आधार कार्ड आयडीमध्ये पहिले 8 आधार क्रमांक ‘XXXX-XXXX’ असे लिहिलेले दिसतात. यामुळे आधारचा कोणत्याही प्रकारे होणारा गैरवापर टाळता येईल.
मास्क्ड आधार कार्ड कोणालाही डाउनलोड करता येईल
मास्क्ड आधार PDF स्वरूपात देखील उपलब्ध आहे. तो पासवर्ड द्वारे सिक्योर्ड केला जातो. डाउनलोड केल्यानंतर, मास्क्ड आधार कार्डचा पासवर्ड तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल. कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळण्याण्यासाठी, आधार कार्ड धारक आपले मास्क्ड आधार कार्ड 6 सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.
अशाप्रकारे डाउनलोड करा
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा आणि ‘आधार डाउनलोड करा’ पर्यायावर क्लिक करा. आधार / व्हीआयडी / इनरोलमेंट आईडी पर्याय निवडा आणि मास्क्ड आधार पर्यायावर टिक करा. रिक्वेस्ट केलेली माहिती येथे एंटर करा आणि ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. तुमच्या आधार-रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. OTP एंटर करा आणि ‘आधार डाउनलोड करा’ वर क्लिक करा. यानंतर, मास्क्ड Aadhar Card डाउनलोड करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.uidai.gov.in/283-faqs/aadhaar-online-services/e-aadhaar/1887-what-is-masked-aadhaar.html
हे पण वाचा :
आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!
Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!
Sim Card Rule : आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळवण्यात येईल अडचण, जाणून घ्या सरकारचा नवा नियम
Bollywood चे ‘हे’ पाच स्टार्स आपल्या बॉडीगार्डना देतात इतका पगार