पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास केला आणि त्या रात्री नक्की काय घडले हे जाणून घेतले. Palghar Lynching

व्हिडिओत नक्की काय दिसत आहे ?
व्हायरल होत असलेल्या दोन तीन व्हिडिओंमध्ये २ साधूंना जमाव मारहाण करताना दिसत आहे. अनेक माध्यमांनी या प्रकरणाला मॉब लैनचिंग म्हटले आहे. या व्हिडिओत तीन-चार पोलीस कर्मचारीसुद्धा दिसत आहे. जमावापासून साधूंना वाचवण्यासाठी पोलिसांनी त्यांना रस्त्यावर बसवलं आहे. मात्र मध्ये त्यातील एक साधू उठून एका भिंतीच्या आड जातो तोच जमाव त्याच्यावर हल्ला करतो. तर दुसऱ्या एका व्हिडिओत पोलीस एका साधूला कोणत्या तरी खोलीतून बाहेर घेऊन येताना दिसतो आहे. डोक्याला जबर मार लागलेला साधू पोलिसाच्या हाताला धरून चालताना दिसत आहे. मात्र जमावातील काही जण साधूला काठीने मारहाण करत आहेत. जमाव जास्त अग्रेसिव्ह झाल्याचे पाहून पोलिसाने साधूला सोडून दिले आहे. त्यानंतर जमावाने सदर साधूला खाली पडेपर्यंत काठ्यांनी मारहाण केली आहे. दुसऱ्या एका व्हिडिओतही एका साधूला जमाव अशाच पद्धतीने मारहाण करताना दिसत आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.  Palghar Lynching

https://twitter.com/sambitswaraj/status/1251959986105782272

घटना नक्की कधी, कोठे, कशी घडली ?
व्हायरल होत असणारा व्हिडीओ हा रविवारच्या घटनेचा नसून गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेचा आहे. मात्र रविवारी तो अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशभर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. सदर घटना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घडली आहे. त्यावेळी सदर परिसरात चोर सुटले असल्याची अफवा पसरली होती. नाशिक किंवा मुंबई येथून सुरतच्या दिशेने निघालेल्या एका गाडीला पालघरमध्ये जमावाने अडवले. गाडीत त्यावेळी दोन साधू आणि त्यांचा ड्राइव्हर असे तिघे जण होते. हे तिघे चोर असल्याचा संशय जमावाला आला. जमाव तणावात असल्याचे लक्षात येताच ड्राइव्हरने पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचले मात्र जमाव ऐकायच्या मनस्थितीत न्हवता. आणि जमावाने दोन साधू आणि एक ड्राइव्हर यांना मारून टाकले. सुशील गिरी महाराज (35), चिकने महाराज कल्पवरुक्षगिरी आणि ड्राईवर नीलेश तेलगाडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

हिंसाचाराचे मुख्य कारण धार्मिक आहे काय?
साधूंच्या मॉब लिंचिंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी सादर घटनेला धार्मिक रंग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सादर हिंसाचार एकाच धर्मांतील नागरिकांमध्ये झाला असल्याची माहिती महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे. त्यामुळे हिंसाचाराचे मुख्य कारण धार्मिक नसून गैरसमज/अफवा हेच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया –
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

११० आरोपींना महाराष्ट्र पोलिसांकडून अटक
महाराष्ट्र पोलिसांनी सदर घटनेतील ११० आरापींना अटक केली आहे. हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व @MahaCyber1 ला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. Palghar Lynching

आरोपींना ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
लिंचिंग प्रकरणी ११० आरोपींना अटक केले असून यातील ९ जण अल्पवयीन असल्याचए सांगितले आहे. तसेच या सर्वांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे अशी माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न?
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या घटनेचा निषेध नोंदवत सदर घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.  Palghar Lynching

Leave a Comment