हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 31 डिसेंबर… आज 2022 मधील अखेरचा दिवस असून उद्यापासून 2023 हे नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षात प्रत्येकजण नवे संकल्प मांडत असतो आणि प्रत्येकाला नव्या वर्षात नवनवीन आशा असतात.. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी 2022 ने काय दिलं आणि 2023 मध्ये देशापुढे कोणती आव्हाने असतील याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले, मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या. जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सर्वसामान्य लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी सामना करण्याची आवश्यकता होती, ती केली. आता उद्यापासून नवीन वर्ष सुरु होतंय. नवं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल. आपल्या देशातील 56 ते 60 टक्के लोक शेतीवर (Agriculture) अवलंबून आहेत. येणाऱ्या वर्षात चांगला पाऊस झाला तर हे वर्ष चांगलं जायला काही हरकत नाही असं ते म्हणाले.
2024 निवडणुकीसाठी राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/SfTZfCmhQX#Hellomaharashtra @RahulGandhi @INCMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 31, 2022
बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात. त्यासाठी व्यापार उद्योगातही चांगले दिवस येणं गरजेचं असल्याचे शरद पवार म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणीही सत्तेवर असलं तरी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वांना राजकीय मतभेत सोडून एकत्र यावं लागेल. अर्थव्यवस्था (Economy) नीट करावी लागेल. हेच आपल्यापुढं नवीन वर्षात आव्हान आहे असं शरद पवार म्हणाले.