हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhaar Card : सध्याच्या काळात काळात मतदानाचे कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पासपोर्ट यासारखी कागदपत्रे खूप महत्त्वाची ठरत आहेत. या काळात या कागदपत्रांशिवाय कोणतेही काम केले जाऊ शकत नाही. या कागदपत्रांचा वापर पत्त्याच्या पुराव्याबरोबरच ओळखीच्या पुराव्यासाठी देखील केला जात आहे. मात्र जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या या सर्व कागदपत्रांचे काय करायचे??? याचा विचार आपल्या डोक्यात कधी आलाय का ???
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती कधी ना कधी येत असते. आज ही कागदपत्रे जवळ नाहीत अशी व्यक्ती कवचितच सापडेल. मात्र एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कागदपत्रांचे काय करावे का??? ही कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावीत कि ती आपोआप रद्द होतील??? चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात… Aadhaar Card
आधार कार्डचे काय करावे ???
आजकाल आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. याद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मृत व्यक्तीचे कार्ड UIDAI वेबसाइटद्वारे लॉक करता येईल. आधार कार्ड फक्त लॉकच केले जाऊ शकते. कारण ते रद्द करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नाही. याशिवाय मृत व्यक्तीच्या आधारकार्डशी सरकारी लिंक असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागेल. Aadhaar Card
पॅन कार्डचे काय करावे ???
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. बँक खाते उघडायचे असो कि कर्ज घ्यायचे असो कि इन्कम टॅक्स भरायचा असो, या सर्व महत्वाच्या कामांसाठी हे आवश्यक आहे. तसेच ते बँक खात्याशी जोडले गेलेले असल्याने एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे मृत पॅनकार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जमा करावे. मात्र, तसे करण्यापूर्वी सर्व बँक खाती बंद केली जावीत. Aadhaar Card
मतदानाच्या कार्डचे काय करावे ???
जर एखाद्या व्यक्तीकडे मतदार कार्ड असेल तरच त्याला निवडणुकीमध्ये मतदान करता येईल. आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच मतदार कार्ड बनवता येते. मात्र, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे मतदार कार्ड रद्द करता येते. यासाठी निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-7 भरावा लागेल. ज्यानंतर हे कार्ड रद्द केले जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, मतदार कार्ड रद्द करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. Aadhaar Card
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ 2 मोठ्या बँकांच्या FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!
Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा
‘या’ Multibagger Stock गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
FD Rates : ‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार*