हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी शिवराज्याभिषेक आहे. २००७ पासून रायगडावर शिराज्याभिषेक हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मात्र यंदा दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कशा पद्धतीने साजरा होणार असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी याचे उत्तर फेसबुकच्या माध्यमातून दिले आहे. बालाजी गाडे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह च्या मुलाखतीतून संभाजीराजे यांना यावर्षी शिवराज्याभिषेक कसा होणार हा प्रश्न विचारला होता. त्यांनी यावर्षी शिवराज्याभिषेक कसा साजरा होईल याची माहिती दिली आहे.
यावर्षीचा राज्याभिषेक हा दरवर्षी प्रमाणे गाजावाजात केला जाणार नसला तरी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत विधिवत रित्या तो रायगडावर केला जाणार आहे. आणि याचे प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. यावर्षी सर्व शिवभक्तांनी आपल्या घरावर भगवे झेंडे रोवून राज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन त्यांनी याआधी केले होते. मात्र ते स्वतः काही मोजक्या शिवभक्तांसह तिथे जाऊन साध्या पद्धतीनेच मात्र विधिवत राज्याभिषेक करणार आहेत असे त्यांनी सांगितले. कोरोनासोबत आता चक्रीवादळामुळे देखील रायगडाच्या आसपासच्या सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या असल्याने या सोहळ्याचे थेट फेसबुक प्रेक्षेपण करता येईल की नाही याबद्दल शंका आहे मात्र तरीही आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले.
https://www.facebook.com/balajigadepatil/videos/677547573030193/
माध्यमातील लोक गडावर येतील की नाही याचीही सध्या शंका आहे. ते आले तर ठीक नाही आले तरी त्यांच्यापर्यंत मेल, फोटो, व्हिडीओ यांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाची माहिती पोहोचवू असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती लोकांपर्यंत हा सोहळा पोहोचवण्याचे काम नक्की करेल असे त्यांनी सांगितले. या मुलाखतीत शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने विविध रणनीतींनी स्वराज्य स्थापन केले आहे. आणि अशाच पद्धतीने आपण या परिस्थितीशी लढायचे आहे तसेच सकारात्मक राहून आपल्याकडे असणारे ज्ञान लोकहितासाठी वापरावे असे ते म्हणाले. सर्व शिवभक्तांनी केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत असंही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.