राज्यासाठी जो निर्णय असेल, तो पुण्यासाठी नको, अजित पवारांची भूमिका

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा राहिल. मात्र, राज्यासाठी जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. पवार यांनी लॉकडाऊनला विरोध केला नाही, पण त्यातून पुण्याला वगळण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजित पवार म्हणाले, सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आमचं सहकार्य असेल. पण, राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश करू नये. एक आठवड्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्यातून वगळण्यात यावे. निर्णय लागू करू नये. स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ. लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आठ दिवसाचा कडल लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.