WhatsApp मध्ये आता लवकरच जोडले जातील ‘हे’ नवे फिचर्स; आता अ‍ॅपमध्येच घेऊ शकाल ShareChat व्हिडिओंची मजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप दररोज आपल्या युझर्ससाठी नवे फीचर्स घेऊन येत असतात. बर्‍याच दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फिचरवर काम करत आहे जे सोशल मीडिया अ‍ॅप शेअरचॅट युझर्सना या अ‍ॅप मध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये व्हिडिओ प्ले करण्याची परवानगी देईल. व्हॉट्सअ‍ॅप बीटाला ट्रॅक करणार्‍या वेबसाइट WABetaInfo च्या मते, iOS आणि Android च्या बीटा व्हर्जनवर ShareChat व्हिडिओ उपलब्ध होईल.

WABetaInfo च्या अहवालानुसार हे फिचर चालविण्यासाठी युझर्सने iOS 2.20.81.3 आणि Android version 2.20.197.7 इंस्टॉल करणे आवश्यक आहे. या फीचरच्या मदतीने, जेव्हा आपण शेअर चॅट व्हिडिओच्या प्ले आयकॉनवर टॅप कराल, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये स्टार्ट होईल.

हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलगू, तामिळ, बंगाली, ओडिया, कन्नड, आसामी, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि उर्दू यासह 15 ​​भाषांमध्ये शेअर चॅट हे सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. शेअर चॅटवर 60 मिलियनहून अधिक मंथली अ‍ॅक्टिव यूजर आहेत. WABetaInfo च्या मते, व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच बर्‍याच फिचर्सवर काम करण्यास सुरवात केली आहे. ज्यामध्ये एक्सपायरिंग मेसेज फीचर देखील समाविष्ट आहे. युझर्सना सात दिवसात मेसेज ऑटो-डिलीट करण्याची परवानगी आहे.

PIP मोड म्हणजे काय?
जर आपल्याकडे बाहेरून व्हिडिओ येत असेल तर आपण WhatsApp च्या बाहेर न जाताही तो व्हिडिओ तेथे पाहू शकता. म्हणजेच, जर आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपवर यूट्यूबची लिंक असेल तर आपण तो तिकडेही पाहू शकता.

QR कोड फीचरसह कॉन्टॅक्ट अ‍ॅड
व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच क्यूआर कोड फीचर लॉन्च केले आहे. हे फीचर सुरू झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला जाईल. युझर्ससाठी क्यूआर कोड स्कॅन करणे आणि त्यांच्या लिस्टमधील कॉन्टॅक्ट अ‍ॅड करणे खूप सोपे झाले आहे. हे फिचर अ‍ॅपच्या 2.20.171 वर्जनमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅपमधील सेटिंग्जमध्ये अँड्रॉइड आणि iOS युझर्सना त्यांच्या नावापुढे त्यांचा कस्टम क्यूआर कोड दिसू शकतो

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment