मुंबई । हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हि मॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धर्मेंद्रने अभिनयाच्या जगात एक शानदार डाव खेळल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. धर्मेंद्रने आपल्या चित्रपट आयुष्यातील सुमारे 100 यशस्वी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले आहे. मात्र एक चित्रपट असा होता ज्यामध्ये धर्मेंद्र काम करू न शकल्याबद्दल खंत व्यक्त करतो. तो चित्रपट म्हणजे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’.
हृषिकेश मुखर्जी यांच्या या प्रसिद्ध चित्रपट ‘आनंद’ चे डायलॉग्स आणि गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचे दमदार अभिनय सिनेप्रेमी कधी विसरू शकणार नाहीत. 12 मार्च 1971 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बेस्ट फिल्म, बेस्ट डायलॉग, बेस्ट एक्टर, बेस्ट सपोर्टिंग एक्टर, बेस्ट एडिटिंग, बेस्ट स्टोरी, बेस्ट फीचर फिल्मचे फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल एक किस्सा असा आहे की, हा चित्रपट बनवण्याच्या वेळी जेव्हा धर्मेंद्रला कळले की ऋषिकेश यासाठी राजेश खन्नाला घेत आहे, तेव्हा तो फार चिडला.
‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आलेल्या धर्मेंद्रने हा चित्रपट बनवण्याच्या वेळेची हि गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, मला चित्रपटात न घेतल्यामुळे मला चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा खूप राग आला होता. धर्मेंद्रने सांगितले की, ऋषिकेशने मला ‘आनंद’ची स्टोरी सांगितली होती. मला या चित्रपटात कास्ट करायचे होते पण नंतर समजले की, तो राजेश खन्ना याच्यासमवेत हा चित्रपट करत आहे. जेव्हा मला कळले की, लीड एक्टर राजेश खन्नाला घेतले गेले आहे, तेव्हा मी एका रात्री दारूच्या नशेत त्याला फोन केला आणि म्हणालो “ऋषि दा तू मला या चित्रपटात घेणार होता, मला स्टोरी देखील सांगितली होती, मग हा चित्रपट त्याला का दिला?” धर्मेंद्रचे फोनवर बोलणे ऐकल्यानंतर ते म्हणाले,”धरम तू झोप… आपण उद्या सकाळी बोलूयात. असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला… आणि त्यानंतर मी त्यांना पुन्हा पुन्हा फोन करून विचारत होतो की, त्याने असे का केले, त्याने मला रोल का दिला नाही?”
आयुष्याच्या अनिश्चिततेवर आणि मैत्रीवर आधारित या चित्रपटाच्या यशाने इतिहास रचला. या चित्रपटा नंतर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला एक नवीन वलय मिळाले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा