कोहलीची बॅट पूर्वीसारखी पुन्हा कधी तळपणार? टेस्ट कॅप्टनबद्दल काय भविषयवाणी करण्यात आली जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले असून त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. कोहली आता स्वतः कसोटी संघाचा कर्णधार आहे. कोहलीची बॅट बराच काळ शांत दिसत आहे. त्याच्या बॅटमध्ये आता जुनी धार दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न येत आहे की, जुना विराट कोहली कधी दिसणार? कोहलीची बॅट पूर्वीसारखी कधी तळपणार?

या सर्व प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना सुनील गावस्कर यांच्या ताज्या स्टेटमेंट मधून मिळू शकतात. आता जुनाच विराट कोहली पाहायला मिळेल, असा विश्वास माजी कर्णधार गावस्कर यांनी व्यक्त केला. आता त्याच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळणार आहे. कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये होते, ते कोहलीचे 70 वे शतक होते आणि तो त्याच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची आतुरतेने वाट पाहत आहे.

कोहली खुल्या मनाने खेळाचा आनंद घेऊ शकेल
स्‍पोर्ट्स तकशी बोलताना गावसकर म्हणाले की,”आता आपण दोन वर्षांपूर्वीच्या विराट कोहलीला पाहू शकू, जो शतकांमागून शतके ठोकायचा. एकदिवसीय आणि टी-20 च्या कर्णधारपदाचे ओझे नसल्यामुळे कोहली आता खुल्या मनाने आपल्या खेळाचा आनंद घेऊ शकेल, असा त्यांचा विश्वास आहे.

माजी कर्णधार गावसकर यांनी मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले आहे. त्यांचा रोहितवर पूर्ण विश्वास आहे. आपली आयपीएल टीम मुंबई इंडियन्सप्रमाणे तो भारतासाठीही एक यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहेत.

Leave a Comment