Recession : मंदी येण्याची शक्यता असेल तर कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते समजून घ्या

Recession
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recession : सध्या अमेरिकेत मंदी येणार असल्याचा बातम्या दररोज येत आहेत. काही तज्ञ तर मंदी अगदी जवळ असल्याचे सांगत आहेत, तर काही अमेरिकेवर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही सांगत आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, अमेरिकेत जरी मंदी आली तरी भारताला त्याचा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. मात्र तरी पण आर्थिक मंदी आलीच तर पुढे काय होईल अशी भीती देखील अनेक गुंतवणूकदारांना आताच सतावते आहे…

हे जाणून घ्या कि, आर्थिक मंदी हा देखील अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण चक्राचा एक पैलू आहे. कारण जिथे कधी मंदी (Recession) आली नाही असा एकही देश शोधून सापडणार नाही. मात्र या आर्थिक मंदीला तोंड देण्याचे मार्ग माहीत असतील तर इतर लोकांइतका त्याचा फटका आपल्याला बसणार नाही. त्यांच्यापेक्षा आपण जास्त फायद्यात असाल. अर्थात हा फायदा थोडा कमी जरूर असेल. चला तर मग आज आपण मंदीच्‍या काळात कुठे गुंतवणूक करणे चांगले ठरेल आणि कोणत्‍या गोष्‍टी टाळायला हव्यात याबाबतची माहिती घेउयात …

What is a Recession? - Small Business Trends

फिक्स्ड इनकमने दाखवला चमत्कार

एका मीडिया रिपोर्टनुसार, काही मार्केट एक्सपर्ट्सनी यूएस नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चने जाहीर केलेल्या मंदीच्या काळातील गेल्या 50 वर्षांच्या आकडेवारीचा तपशीलवार अभ्यास केला. यामध्ये त्यांना असे आढळून आले की, मंदी (Recession) सुरू होईपर्यंतच्या (1973-75, 1980, 1981-82, 1990-91, 2001, 2007-09 आणि 2020) वर्षांमध्ये शेअर्सनी चांगली कामगिरी केली होती, मात्र मंदी आल्यानंतर फिक्स्ड इनकमने जास्त चांगले रिटर्न दिले.

यादरम्यान संशोधकांनी यूएस हाय यील्ड बॉन्ड्स, यूएस लॉन्ग टर्म बॉन्ड्स, यूएस शॉर्ट टर्म बॉन्ड्स, यूएस टोटल फिक्स्ड इनकम, यूएस ग्रोथ स्टॉक, यूएस व्हॅल्यू स्टॉक, यूएस स्मॉल-कॅप इक्विटी, आंतरराष्ट्रीय इक्विटी आणि यूएस लार्ज-कॅप इक्विटीचा अभ्यास केला.

Are Any Stocks 'Recession Proof'?

मंदी येण्याआधी आणि मंदी आल्यानंतर

या अभ्यासामध्ये असे आढळून आले कि, मंदी (Recession) सुरू होण्याच्या नऊ महिन्यांपूर्वी, यूएस ग्रोथ स्टॉक्सने सरासरी मंथली रिटर्न 0.92 टक्के (11.6 टक्के कंपाऊंड ऍन्युअल रिटर्न) दिला. यानंतर यूएस स्मॉल-कॅप इक्विटींनी 0.83% (10.4 टक्के कंपाऊंड ऍन्युअल रिटर्न) मंथली रिटर्न दिला. यूएस एकूण निश्चित उत्पन्नाने 0.48% (5.9% वार्षिक) मंथली रिटर्न दिला.

मंदी सुरू झाल्यावर वातावरण बदलले. यूएस टोटल फिक्स्ड इनकमने 0.62% (7.7% वार्षिक) मंथली रिटर्न दिला, तर यूएस ग्रोथ स्टॉक्सने 0.12% मासिक (1.5% वार्षिक) रिटर्न दिला. इतर सर्व इक्विटी वर्गांनी निगेटिव्ह रिटर्न दिला.

When A Recession Comes, Don't Stop Advertising

या अभ्यासातून काय निष्कर्ष निघाले ???

या अभ्यासाचे निष्कर्ष पाहिल्यास फिक्स्ड इनकम हे असे साधन असल्याचे दिसून येते, जे आर्थिक मंदीतही (Recession) गुंतवणूकदारांना निराश करत नाही. मात्र इक्विटीमध्ये तोटा देखील होतो. इथे हे लक्षात घ्या कि, वर दिलेली सर्व उदाहरणे ही अमेरिकेतील मंदीची आहेत, मात्र जेव्हा जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या सावटाखाली येते तेव्हा हे नियम नक्कीच कामी येतात. यामुळेच फायनान्शिअल एक्सपर्ट्सकडून नेहमीच सर्व पैसे इक्विटीमध्ये गुंतवण्याऐवजी कर्जाच्या मालमत्तेत (Debt Assest) गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. कारण काही पैसे कर्जामध्ये गुंतवलेले असल्याने आर्थिक मंदीच्या (Recession) स्थितीतही बॅलन्स राहतो. म्हणजे गुंतवणूकदाराला जास्त फायदा होत नसेल तर तोटा होण्याची शक्यता देखील याद्वारे कमी होते. Recession

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.nseindia.com/market-data/live-market-indices

हे पण वाचा :

Bank FD : फिक्स्ड रेट किंवा फ्लोटिंग रेट यापैकी कोणत्या FD मध्ये जास्त रिटर्न मिळेल ते समजून घ्या

Aadhaar Card मधील मोबाईल नंबर कसा बदलायचा ते जाणून घ्या !!!

Bank : सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशभरात उघडल्या जाणार 300 नवीन शाखा !!!

HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा

‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!