Wednesday, February 8, 2023

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार राहणार की नाही याबाबत निर्णय पुढील 4 महिन्यांत होणार !

- Advertisement -

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात ICC च्या सलग तीन स्पर्धांत भारताला पराभव पत्करावा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना, विश्वचषक 2019 चा उपांत्य सामना आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला. नुकत्याच झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ लागली आहेत. आता माजी यष्टिरक्षक सबा करीमने विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे. सबा करीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की,” विराट कोहलीवरील दबाव सतत वाढत आहे आणि टी -20 विश्वचषकानंतर तो निर्णय घेऊ शकतो की भविष्यात तो कर्णधार असणार की नाही.”

इंडिया न्यूज स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात सबा करीम म्हणाला की,” टीम इंडिया टी -20 वर्ल्ड कप जिंकल्यास विराट कोहलीला थोडा दिलासा मिळेल, अन्यथा त्याच्या कर्णधार पदावरील धोका आहे.” सबा करीम पुढे म्हणाला की,”टी -20 वर्ल्ड कप विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विराट कोहलीवर सध्या दबाव वाढत आहे कारण त्याला माहित आहे की, त्याने अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. तर आता टी 20 वर्ल्ड कप जिंकणे हे त्याचे मुख्य लक्ष्य असेल.” सबा करीम असेही म्हणाला की, “टीम इंडियाने ट्रॉफी जिंकल्यास विराट कोहलीला दिलासा मिळेल असे मला वाटते. कदाचित तो परिस्थितीचा अंदाज घेईल आणि संघाचा कर्णधार म्हणून किती काळ राहू इच्छित आहे हे ठरवेल. मोठ्या कर्णधारांच्या यादीत त्याचे नाव येते मात्र ICC ट्रॉफी अद्यापही त्याच्या खात्यात नाही.”

- Advertisement -

टी -20 वर्ल्ड कप ऑक्टोबरमध्ये आहे
हे लक्षात घ्या कि,” टी -20 वर्ल्ड कप 2021 आता भारताऐवजी युएई-ओमानमध्ये होईल. कोरोना साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार नाही, असे ICC ने मंगळवारी जाहीर केले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 8 पात्रता संघ आमनेसामने येतील, ज्यांचे सामने ओमानमध्ये होतील. यानंतर चार संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील.

टीम इंडिया हा विजयासाठी मोठा दावेदार आहे
ICC च्या प्रत्येक स्पर्धेप्रमाणे टीम इंडिया या टी -20 विश्वचषकातही विजयासाठी मोठा दावेदार असेल. फलंदाजी आणि गोलंदाजीत संघाकडे अनेक पर्याय आहेत. चांगली गोष्ट म्हणजे सर्व खेळाडू टी -20 विश्वचषक होण्यापूर्वी IPL च्या दुसर्‍या फेरीतही खेळतील. ज्यामुळे टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांची तयारी आणखी मजबूत होईल. केवळ भारतीय संघाला बाद फेरीतील सामन्यात आपल्या खेळाची पातळी वाढवावी लागेल कारण 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर येथे ते चुका करत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group