पुणे | राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून त्यांनी पुणेकरांना खूष केल्याचे दिसत आहे. पुणे साठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
पुण्यात आणखी एक विमानतळ
पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली.
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून, त्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथए क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणी
पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोडचे करण्यात येईल. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल.
पुणे, नगर, नाशिक जलद रेल्वेला मंजुरी
पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाच्या बांधकामासाठी 28 कोटींची तरतूद
राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा अजित पवार यांनी केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातल्या वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिवसांपासून निवासस्थानाचा मुद्दा चर्चेत आला होता. या निवासस्थानांच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली.