हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यादरम्यान, आज आपण अर्थसंकल्पाशी संबंधित एका खास गोष्टीविषयीची माहिती जाणून घेऊयात. हे जाणून घ्या कि, प्रत्यक्षात देशाचा अर्थसंकल्प बनवण्याच्या कामात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना तब्बल 10 दिवस बंदीवासात रहावे लागते. मंत्रालयाबाहेरच काय त्यांना अगदी घरी देखील जाऊ दिले जात नाही.
घरी जाण्याची परवानगी नाही
अत्यंत गोपनीय असे अर्थसंकल्पीय दस्तऐवज तयार करताना, त्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना तब्ब्ल 10 दिवस संपूर्ण जगापासून दूर ठेवले जाते. यादरम्यान फक्त अर्थमंत्र्यांच्या अत्यंत वरिष्ठ आणि विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी दिली जाते. तसेच अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होईपर्यंत या प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था देखील केली जाते. यादरम्यान अर्थ मंत्रालयात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येत नाही. फक्त अर्थसंकल्पीय दस्तऐवज तयार करणाऱ्या टीमलाच नाही तर त्याच्या प्रिंटिंगशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील बाहेर येण्याची किंवा सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही.
मोबाईल नेटवर्क देखील बंद
संसदेत अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होईपर्यंत, अर्थ मंत्रालयातील गुप्तचर विभागाच्या सायबर सिक्योरिटी सेलद्वारे सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवली जाते. यादरम्यान मंत्रालयात कोणत्याही मोबाईलचे नेटवर्क काम करत नाही. यावेळी फक्त लँडलाइन फोनवरूनच संभाषण करता येते. वास्तविक, देशाच्या आर्थिक बाबींशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये यासाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात येते. त्यामुळेच या महत्त्वाच्या कामातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेरच्या जगापासून दूर ठेवले जाते.
डॉक्टरांची टीमही तैनात
या 10 दिवसांदरम्यान अर्थ मंत्रालयात सर्व आवश्यक सुविधांसहीत डॉक्टरांची टीम देखील तैनात केली जाते. जेणेकरून यादरम्यान जर एखादा कर्मचाऱ्याची तब्येत खराब झाली तर त्याच्यावर तिथेच वैद्यकीय उपचार करता येतील. हे जाणून घ्या कि, या 10 दिवसांत आजारी कर्मचाऱ्याला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासही मनाई असते.
इंटरनेटवरही निर्बंध
अर्थसंकल्प (Budget 2023) तयार करतानाच्या 10 दिवसांत इंटरनेट वापरावर देखील बंदी घालण्यात येते. ज्या कॉम्प्युटरवर अर्थसंकल्पीय दस्तऐवज असतात त्या कॉम्प्युटरवरून इंटरनेट NIC सर्व्हर देखील डीलिंक करण्यात येते. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगची भीती नसते. हे कॉम्प्युटर फक्त प्रिंटर आणि प्रिंटिंग मशीनशीच जोडले जातात. अर्थ मंत्रालयाच्या ज्या भागात प्रिंटिंग प्रेस आहे, तिथेही काही निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जाण्याची परवानगी असते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???