…म्हणून अजित पवारांनी केलं होत बंड! चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात भाजप-शिवसेनाच्या युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत मोठा कलह होऊन अखेर युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली. पण या दरम्यान महाराष्ट्राने मोठा सत्तासंघर्ष पाहिला. या सत्तासंघर्षातील एक महत्वाचं प्रकरण म्हणजे, महाविकासआघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना अजित पवार अचानक भाजपच्या गोटात सामील होणं.

संपूर्ण महाराष्ट्राला खडबुडून जागी करणारी ती सकाळ लक्षात आहे. ज्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता.राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येऊन ६ महिने उलटले तरी पण अनेकांच्या मनात एक प्रश्न अजूनही घर करुन आहे की, अजित पवारांनी का त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती.

अजित पवार यांनी बंड का केले? हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. पण पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या चेकमेट पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पुस्तकात असं म्हटलं आहे की, शिवसेनेसोबत वाटाघाडी सुरु असताना सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्याचं ठरलं. त्यानंतर अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली. त्यामुळे नाराज झालेले अजितदादा बैठकीतून निघून गेले. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना धक्का देण्याचं ठरवलं.

२२ नोव्हेंबरच्या रात्री बैठकीतून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोफिटल हॉटेलमध्ये चर्चा झाली. अजित पवार 38 आमदार फोडण्याच्या तयारीत होते. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना देखील माहित होता. ३८ पैकी २० जणांना मंत्रिपद देण्याची चर्चा ही झाली होती. पण शरद पवारांना याबाबत काहीच माहित नव्हते. पण सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. बहुमत नसल्यामुळे दोघांनी राजीनामा दिला. पण नंतर पुन्हा अजितदादा यांना महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment