फार्मा कंपनीच्या मालकावर कारवाई झाल्यानंतर फडणवीस, दरेकर पोलीस ठाण्यात का गेले? नवाब मलिकांचा सवाल

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले. “देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मलिक म्हणाले, “देशामध्ये सात कंपन्यांना देशांतर्गंत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना पदरेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट १७ कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून राज्य सरकारकडे विक्रीची परवानगी मागत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न न औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. माझ्याकडे साठा आहे, परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो अशी माहिती दिली. पोलिसांना निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती गोळी केली जात होती,” असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी, जनतेसाठी काम करत आहे. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजपा का घाबरते? सगळा भाजपा वकिलीसाठी का जात आहे? फडणवीस वकील आहेत…ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते? जर महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपाचे प्रमुख नेते तिकडे जातात यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“ट्विट करुन ५० हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे सांगता. पण सरकार मागतं तेव्हा ते लोक देत नाही, मग त्यांच्या मागे काय राजकारण आहे हे भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे. ज्यांनी साठा ठेवला त्यांना चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर भाजपा नेते वकिलीसाठी पोलीस ठाण्यात जातात हे योग्य नाही…हे त्यांना शोभत नाही. विरोधी पक्षनेता फोनवरुन माहिती घेऊ शकतो, वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. पोलीस ठाण्यात जाऊन वकिली करणं काय राजकारण आहे माहिती नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here