कुत्रे ‘हे’ रात्रीचेच का रडतात? रहस्य जाणून चकित व्हाल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुत्रा रात्री अपरात्री मोठयाने रडत असतो. त्याचा रडण्याचा आवाज भितीदायक आणि अतिशय घाबरवून सोडणारा असतो. जुने लोकं कुत्रे रडताना त्याचा संबंध वेगवेगळ्या प्रकारे लावत असतात. काही लोक या रडण्याचा संबंध भूत प्रेतांशी तर काही लोक हाच संबंध कुटुंबातील कोणाच्या जीवनाशी लावतात. जाणून घेऊ कुत्रे हे रात्रीच का रडत असते. खरेच त्याला भूत दिसते की अजून काही.

माणसं एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच प्राणीही एकमेकांशी संवाद साधत असतात. कुत्र्याच्या तश्या आवाजाला रडणे हा आपण आपल्या सोयीने नाव दिले आहे. तो रात्री इतर कुत्र्याशी संवाद साधण्यासाठी तसे आवाज काढत असतो. संवाद साधला की, इतर कुत्रेही सावध होतात. ते पण तसाच आवाज काढत असतात. माणसाला ते रडल्यासारखे वाटत असते.

रात्री अचानक काही हालचाली झाल्या की कुत्रा सावध होतो. त्याच्या आजूबाजूच्या कुत्र्यांना जागे करण्यासाठी तो विशिष्ठ आवाज काढत असतो. आणि आजूबाजूचे कुत्रे तो आवाज ऐकून त्याला प्रतिसाद देत असतात. हा आवाज भीती निर्माण करणारा असतो. यामुळे अनेक लोक या आवाजाला वेगवेगळ्या गोष्टींशी जोडतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”