हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली होती त्यापैकी बहुतेकांना सुरुवातीला खात्री होती की, ते आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र ओमीक्रॉन च्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लस घेऊनही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज पाहून जाणून घेणार आहोत यामागील प्रमुख कारणे …
लस घेऊनही संसर्ग कसा होतो आहे ?
अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (US-CDCP) सह इतर मोठ्या संस्थांचे शास्त्रज्ञ, तज्ञांनी लस असूनही संसर्ग होण्याच्या स्थितीला ब्रेक-थ्रू संसर्ग म्हटले आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटनुसार, ब्रेक-थ्रू संसर्ग असलेली लोकं इतर लोकांनाही त्याच प्रकारे संक्रमित करू शकतात, मात्र ते सामान्य संसर्ग असलेल्या लोकांप्रमाणेच ते करत आहेत. कारण लस न घेणाऱ्यांच्या नाकात जितके विषाणू जमा होतात तितकेच विषाणू या लोकांच्या नाकातही जमा होतात. म्हणजेच, दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी परिस्थिती सारखीच असते.
ब्रेक-थ्रू संसर्ग का होत आहे?
ब्रेक-थ्रू संसर्गाबाबत ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या दोन अभ्यासानुसार, कोरोनाविरुद्धची कोणतीही लस कोणत्याही आजारापासून 100% संरक्षण देत नाही. दुसरे- सध्या जगभरातील कोरोना लस अशा आहेत, ज्याचा प्रभाव फक्त 4-6 महिने टिकतो. यानंतर, त्यांच्याद्वारे शरीराला दिलेली प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. ‘द कॉन्व्हर्सेशन’नुसार, या स्थितीला ‘Waning Immunity’ म्हणतात. तिसरी गोष्ट- जेव्हा जगभरात लस मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती, त्याच वेळी कोरोनाचा सर्वात घातक डेल्टा व्हेरिएन्ट कहर करत होता. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा वेग आणखी वाढला. यावर चौथी गोष्ट- लोकांचा निष्काळजीपणा. कारण लस दिल्यानंतर मास्क न लावणे, सोहळ डिस्टंसिंग न पाळणे, वारंवार हात न धुणे यासारखा निष्काळजीपणा बहुतांश लोकांमध्ये दिसून येत आहे.
त्यामुळे अजूनही धोका आहे का?
होय. कारण लस मिळाल्याचा अर्थ असा होत नाही की कोरोनाचा संसर्ग होणार नाही. जगातील सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणाऱ्या इस्रायलचा डेटा, तेथेही कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याचे दर्शवित आहे. इस्रायलशी संबंधित आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिली – डिसेंबर-2020 मध्ये तेथे कोरोना लसीकरण सुरू झाले. 2021 च्या मध्यापर्यंत, तेथे जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले होते. म्हणजे सर्व लोकांना लस देऊन सहा महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. त्यामुळेच तेथे पूर्वीपासून प्रतिकारशक्ती कमी होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुढे काय शक्यता आहेत?
फक्त दोन मार्ग आहेत. एक- लसीचा प्रभाव 4-6 महिन्यांत संपत असल्याने. म्हणूनच प्रत्येकाला बूस्टर डोस घ्यावा लागेल. कदाचित एकापेक्षा जास्त वेळा. दुसरे म्हणजे लस आणखी प्रभावी बनवण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. भविष्यात नवीन जास्त प्रभावी लस येऊ शकतात. ते कदाचित कोरोनाचा (कोविड-19) प्रभाव पूर्णपणे काढून टाकण्यास सक्षम असतील.