मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील एकापाठोपाठ 5 प्रकल्प गुजरात आणि हैदराबादला गेल्यामुळे शिंदे सरकारवर सगळीकडून टीका करण्यात येत आहे. या सगळ्यावरून जर सगळेच उद्योग गुजरातला जात असतील तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे, त्यामुळे महाराष्ट्राकडे व्यवस्थितीत लक्ष तरी दिले जाईल, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andahare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
सुषमा अंधारेंचा भाजपवर आरोप
शिंदे सरकारच्या काळात 5 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले. जर तुम्ही असेच गुजरातला प्रकल्प देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवावे. त्यामुळे ते राज्याकडे लक्ष तरी देतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे. कोकणातील सिंधुदुर्ग गोव्याला जोडण्याचा डाव भाजपने आखला आहे, असा आरोप सुषमा अंधारे (sushma andahare) यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाची एकच चौकट आहे. फक्त नवरात्राीच्या, गणेशोत्सवाच्या आरत्या करणे आणि पितृपक्षात जेवणे करणे एवढीच काम या दोघांना आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद कशाला हवे असा टोलादेखील सुषमा अंधारे (sushma andahare) यांनी यावेळी लगावला.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी