पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न भरसभेत विचारला त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केले आहे. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.
'टिकली'वर टीका करणारे 'साडी'वर या नेत्यांना सोलणार का..?
चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या !बिंदी पर टिप्पणी करने बखैडा खडे करनेवाले "साड़ी" पर टिप्पणी करने वाले इस नेता को टिप्पणी किये बगैर बखैडा खडा किये बगैर ही छोड़ देंगे क्या..?
चलो आप लोगों की इस बार परिक्षा हो जाये pic.twitter.com/O55GM9xqWt
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 20, 2022
काय म्हणाल्या चित्र वाघ?
‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय