जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी तालुक्यात हिंसाचाराचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेले अजित सिंह यादव यांनी आपली बायको सुमनविरोधात आपला छळ करत असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपली बायको आपल्याला तवा, काठी, बॅट किंवा हातात जी काही वस्तू मिळेल त्याने बेदम मारहाण (wife beating husband) करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच आपल्या पत्नीविरोधात पुरावे मिळावे म्हणून त्यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही बसवले आहेत. भिवाडी कोर्टात या मारहाणीचे (wife beating husband) सीसीटीव्ही फुटेज सादर करत आपल्याला सुरक्षा आणि न्याय देण्याची मागणी केली आहे.
प्रिन्सिपल नवऱ्याला पत्नीकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/yiCWmwfWtG
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 26, 2022
पीडित अजित यांचे सात वर्षांपूर्वी सुमन यांच्याशी लव्ह झाले होते. यानंतर काही काळानंतर सुमन यांच्या वागण्यात बदल झाला. आणि ती आपल्या पतीला टॉर्चर करू लागली. कधी क्रिकेट खेळण्याच्या बॅटने, कधी जेवण बनवण्याच्या तव्याने तिने आपल्या पतीला मारहाण (wife beating husband) करण्यास सुरुवात केली. घरातील जी वस्तू हाती लागेल त्याने ती आपल्या पतीला दररोज मारहाण करते. बायको मारून मारून आपल्याला घरातून हाकलून लावते. एखाद्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करते. असा आरोप पीडित अजित सिंह यादव यांनी केला आहे. अजित यांच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आहेत.
अजित म्हणाले, इतकं सर्व घडूनही सुमनवर कधीच हात उचलला नाही. कायदा हातात घेतला नाही. मी एक शिक्षक आहे आणि शिक्षकाने महिलेवर हात उचलणं म्हणजे आपला पेशा आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेत. कायदा हातात घेणं आहे. जर हे माझ्या विद्यार्थ्यांना समजलं असतं तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असता. त्यांना एक मुलगाही आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे कि, सुमन आपल्या पतीला मुलासमोर मारहाण (wife beating husband) करत आहे. त्यांचा मुलगादेखील घाबरलेला दिसत आहे. अजित सिंह मानसिकरित्याही आजारी पडले आहेत. काही क्षणातच ते सर्वकाही विसरतात. फक्त कामच नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांची नावंही विसरतात. तसेच अमेरिकेत असलेला बायकोचा भाऊच तिला हे सर्व करायला भाग पाडत असल्याचा आरोप अजित यादव यांनी केला आहे.
हे पण वाचा :
म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..
IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन
ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…
राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल