मदर डेच्या दिवशी दोन चिमुकल्या झाल्या अनाथ, आईने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Lakhundar Police Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एकदा मनात संशयाची पाल चुकचुकली कि माणूस कोणत्या ठरला जाईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर शहरात घडली आहे. यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सातत्याने शारिरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संगीता प्रकाश दुंडे असे मृत महिलेचे नाव आहे तर प्रकाश नामदेव दुंडे असे आरोपी पतीचे नाव आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मृत संगीताचे 2017 मध्ये आरोपी प्रकाशसोबत सामाजिक रितीरिवाजानुसार लग्न झाले होते. विवाहानंतर त्यांना लक्षिता वय 4 वर्ष आणि अनुष्का वय 5 महिने अशी दोन अपत्ये सुद्धा झाली. मात्र लग्नाला 5 वर्ष होऊन ही प्रकाश संगीताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्या दोघां पती पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात सतत भांडण होत होते. यावेळी आरोपी प्रकाश संगीताचा शारिरिक व मानसिक छळ करत होता.

यानंतर मात्र हे सगळे सहन न झाल्याने संगीताने अखेर घराच्या धाब्यावर गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संगीताचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर मृत संगीताच्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. संगीताने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे दोन चिमुकले अनाथ झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लाखांदुर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा 
Gold Price : सोने महागले तर चांदी घसरली

आता तुम्ही कोणाची औलाद आहात ते सांगावे; अजित दादांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच…

वाघाची डरकाळी अन् भगवा झेंडा….; उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर पहाच…..

“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला