सांगली । आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडी येथे अंनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने तिघांच्या साथीने खून केल्याची धक्कादायक घटना उडाली आहे. सतिश उत्तम धुमाळ यांच्या डोळयातील गंभीर जखमी करून खून केल्याचे तपासत स्पष्ट झाले. चौघांनी साडीने सतिश उत्तम धुमाळ ( वय 32) यांचा मृतदेह घरात गळफास लावून मृत झाल्याचा बनाव केला होता. आटपाडी पोलिसांनी या घटनेची नातेवाईकांकडे कसून चौकाशी केल्यानंतर खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर घटनेचे फिर्याद अनुराज नंदकुमार पवार यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी चंदा सतिष धुमाळ, मेव्हणा चेतन बलभिम वाडेकर, साडू अतूल पवार, मेव्हणी मोनिका अतुल पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मृत सतिश धुमाळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावचे आहेत. ते आचारी काम करत होते. पत्नी व नातेवाईकांसोबत सध्या खरसुंडी येथे घडशी गल्लीमध्ये राहत होते.
मंगळवारी सकाळी सतिश धुमाळ याचा घरालगत मृहदेह आढळून आला. त्याच्या डोक्यामध्ये मार लागल्याचे व्रण असून रक्तस्राव झाला आहे. घरामध्ये रक्त सांडलेले असून घरातील भिंतीवर रक्ताचे डाग आहेत. दरम्यान, या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली. तपासाकरीता नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घटनास्थळी पोलिस निरिक्षक भानुदास निंभोरे, प्रमोद रोडे, सचिन लोंढे यांनी या घटनेचा तपास केला.