हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील अनेक अनेक रिपोर्ट्समध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL विकणार असल्याचा दावा केला जातो आहे. यासोबतच अनेकांना बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे मेसेज देखील येत आहेत. ज्यामध्ये येत्या 24 तासांत बीएसएनएलचे सिम कार्ड बंद होतील, असे सांगण्यात येत आहे. यामध्ये TRAI चा हवाला देत सांगण्यात आले की,” यासंदर्भात सरकारने एक अधिसूचना देखील जारी केली आहे.”
या मेसेजमध्ये लिहिले आहे की,”ज्या ग्राहकांनी आपले KYC अपडेट केलेले नाही त्यांचा नंबर येत्या 24 तासांत ब्लॉक केला जाईल. ज्यामुळे BSNL चे अनेक ग्राहक चिंतेत आहेत. मात्र, त्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही, कारण हा दावा खोटा आहे.
सरकारी एजन्सी असलेल्या PIB ने याबाबतच्या सत्यतेची तपासणी केली असता हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. PIB ने ट्विट करत ही माहिती दिली असून BSNL कडून अशी कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. यासोबतच ग्राहकांनी आपल्या बँकेची आणि वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचेही सांगण्यात आले आहे. हे लक्षात घ्या की, PIB फॅक्ट चेक ही सरकारी एजन्सी सोशल मीडियावर व्हायरल बनावट मेसेजेस किंवा पोस्ट बाबतच्या सत्यतेचा उलगडा करून लोकांना सतर्क करते.
फसवणूक होऊ शकेल
अशा प्रकारच्या बनावट बातम्या सोशल मीडियावर फार लवकर पसरतात, ज्याचा फायदा फसवणूक करणाऱ्यांना होतो. अशा प्रकारच्या बातम्या पसरवून ही लोकं केवायसीच्या नावावर लोकांची वैयक्तिक तसेच बँकेची माहिती गोळा करून फसवणूक करतात. ज्यामुळे बँकादेखील ग्राहकांना फोन नंबर, बॅक डिटेल्स, नाव, जन्मतारीखेचे तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर न करण्याचा नेहमी सल्ला देतात.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये