कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे ७ एकर जमीन असून धोनी आता शेती करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर धोनीने आर्मी जॉईन केली होती. आता हाच पठया शेती करणार का हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. नवीन ट्रॅक्टरची सवारी करतानाचा त्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

यावर महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनन्द महिंद्रा यांनी ट्विट करत ‘धोनी नेहमी अशा योग्य निर्णयांसाठी ओळखला जातो’ म्हणत आपल्या कंपनीचंही ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही चाणाक्ष उद्योजक म्हणून रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.