हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कोल्हापुरात झालेल्या सभेला कोल्हापूरचे शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी प्रमुख उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज मैदानात उतरतील का? असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतं आहे. याबाबतचं आज TV9 या वृत्तवाहिनीची संवाद साधताना शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. “शाहू महाराज आमच्या सभेला आले याचा आम्हाला आनंद आहे , परंतु त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही” अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.
आज शरद पवारांनी TV9 या मराठी वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना, शाहू महाराज यांची सभेला उपस्थित राहण्यामागील भूमिका नेमकी काय? शाहू महाराज येत्या निवडणुकांमध्ये उतरू शकतात का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “शाहू महाराज आमच्या सभेला उपस्थित राहिले याचा आम्हाला आनंद आहे. परंतु सध्या तरी त्यांची कोणतीही निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. लोकांची इच्छा शाहू महाराजांनी ऐकली तर आम्ही तयारच आहोत” असे शरद पवार यांनी म्हणले आहे.
कोल्हापूरमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या सभेसाठी शाहू महाराज यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज लढतील का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, जर लोकांच्या इतिहासासाठी शाहू महाराजांनी निर्णय बदलला तर येत्या निवडणुकांमध्ये ते उतरु शकतात अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
भाजपवर टीका
दरम्यान, या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी भाजपावर देखील टीका केली आहे. यावेळी बोलताना, लोकं त्यांना जागा दाखवतील म्हणून निवडणुकांना विलंब करत आहेत. भाजपला पाठींबा देणाऱ्या जनतेमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. युवकांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत लवकरचं निर्णय घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.