केंद्र सरकार कोरोनाच्या उपचारासाठी तरुणांना देत आहे 4000 रुपये, ‘या’ व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

0
144
Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजनेंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत मिळणार असल्याचे या मेसेज मध्ये सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह लिहिलेल्या पत्रात या योजनेबाबत सांगितले जात आहे की, पंतप्रधान रामबन सुरक्षा योजनेसाठी नोंदणी सुरू असून या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत मिळणार आहे. नोंदणीसाठी लिंक देखील दिल्या आहेत. भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने या व्हायरल मेसेजमागील सत्यता सांगितली आहे.

जर तुम्हालाही असा काहीसा मेसेज किंवा मेल आला तर काळजी घ्या. तुमच्या पैशांवर सायबर गेन्हेगारांचा डोळा आहे. तुम्ही लिंकवर क्लिक करताच तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या बातमीची सत्यता तपासली आहे. केंद्र सरकारची धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि उपलब्धी याबद्दल मीडियाला माहिती देणारी PIB ही मुख्य संस्था आहे.

PIB ने ट्विट करून म्हटले की, हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. अशा बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत येथे तक्रार करा
सरकारशी संबंधित कोणतीही दिशाभूल करणारी बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB FactCheck ची मदत देखील घेऊ शकता. कोणीही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL PIB FactCheck ला WhatsApp क्रमांक 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here