औरंगाबाद | आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करुन घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीच्या कामगारांनी तसेच महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीने दि. ६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या आमरण उपोषणाची अखेर आज कामगार उपायुक्तांनी दखल घेऊन त्यांनी हस्तक्षेप करत अखेर आज हे आमरण उपोषण सोडवण्यात आले आहे.
विप्रो कंपनीच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामगारांनी दि. ६ मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले होते. या आमरण उपोषणा दरम्यान काही कामगारांची प्रकृती खालावली होती. याची दखल आज कामगार उपायुक्तांनी घेत कंपनीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत कंपनीच्या व्यवस्थापकांनी या मागण्यांवर दि. २२ मार्च पर्यंत सकारात्मक चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे कामगार उपायुक्तांच्या वतीने लेबर कमीशनर अमोल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन कामगारांचे उपोषण सोडविले आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर दि. ११ मार्चपासून सुरू होत असलेल्या अंशतः लॉकडाऊन च्या अनुषंगाने प्रशासनास सहकार्य करावे असे पत्रात नमूद केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.