नवी दिल्ली । एअर इंडियाची कमान आपल्या हातात घेताच या विमान कंपनीच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले जात आहेत. सामाजिक सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअर इंडिया एअरलाइनने आपल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये समाविष्ट केले आहे. या निर्णयामुळे 7,453 कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ दिले जातील ज्यांचे डिसेंबर 2021 साठीचे योगदान एअर इंडियाने EPFO कडे दाखल केले आहे.
यापूर्वी एअर इंडिया लिमिटेडने EPF आणि MP कायदा 1952 च्या कलम 1(4) अंतर्गत कव्हरेजसाठी स्वेच्छेने अर्ज केला होता. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की,” एअर इंडियाने EPFO सुविधेसाठी अर्ज केला होता, त्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.” यापूर्वी, एअर इंडियाचे कर्मचारी 1925 च्या PFकायद्यांतर्गत समाविष्ट होते, जेथे नियोक्ता कंपनी आणि कर्मचार्यांचे PFमधील योगदान 10-10 टक्के होते.
EPFO अंतर्गत अनेक सुविधा उपलब्ध असतील
EPFO नुसार, एअर इंडियाच्या या कर्मचाऱ्यांना आता अनेक फायदे मिळतील. त्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्यांमध्ये त्यांच्या पगाराच्या 12 टक्के अतिरिक्त 2 टक्के नियोक्ता योगदान मिळेल. या कर्मचाऱ्यांना EPF योजना 1952, EPS 1995 (कर्मचारी पेन्शन योजना) आणि EDLI 1976 (ग्रुप इन्शुरन्स) लागू होतील.
कर्मचार्यांना किमान 1,000 रुपये पेन्शन आणि कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास कुटुंब आणि आश्रितांना पेन्शन मिळेल.
एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, किमान 2.50 लाख रुपयांच्या मर्यादेसह आणि कमाल 7 लाख रुपयांच्या मर्यादेसह खात्रीशीर इन्शुरन्सचा फायदा मिळेल. या फायद्यासाठी, EPFO च्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रीमियम आकारला जात नाही.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या 1952-53 सालापासून दोन वेगळ्या कंपन्या होत्या. ते PF कायदा, 1925 अंतर्गत समाविष्ट होते. 2007 मध्ये, दोन्ही कंपन्या एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाल्या. PF कायदा, 1925 नुसार भविष्य निर्वाह निधी लाभ उपलब्ध होता, मात्र कोणतीही वैधानिक पेन्शन योजना किंवा विमा योजना नव्हती.