पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नदी पात्रात बुडत (drawn) असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने माय-लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मावळमधील कामशेत येथील नायगाव या ठिकाणी हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम शिंदे आणि युवराज शिंदे अशी या मृत माय-लेकरांची नावे आहेत.
काय घडले नेमके ?
आई पूनम शिंदे आणि मुलगा युवराज शिंदे हे दोघेही इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. यादरम्यान अचानक युवराजचा पाय घसरून तो पाण्यात पडला. आपल्या मुलाला पाण्यात पडल्याचं पाहून आईने कसलाही विचार न करता त्याचे प्राण वाचवण्यासाठी लगेचच नदीत उडी घेतली. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आई आणि मुलगा दोघेही बुडू (drawn) लागले.
दोघेही पाण्यात बुडू (drawn) लागल्याने जवळच पूनम शिंदेचा भाऊ होता. त्याने माय लेकराला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने त्या माय लेकरांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी महावीर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्या मायलेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. कामशेत पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हात लावला तर…; नाना पटोलेंचा ED ला थेट इशारा
लाचार संजय राऊत यांना “स्मृतीभ्रंश” झालाय; मनसे नेत्याची घणाघाती टीका
विकासाच्या नावाखाली काहींनी पाप करुन ठेवले आहे; मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका
ट्रॅफिक कॉन्स्टेबलची डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण, CCTV फुटेज आले समोर