सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका डॉक्टरला महिलेने ब्लॅकमेल करून तब्बल 60 लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यासंबंधी दोन संशयित महिलांना तपासासाठी पुण्याला घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या महिलांनी अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे तपासात समोर येत आहे. फोन करून त्या बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढायच्या.
प्राची उर्फ श्रद्धा अनिल गायकवाड व पूनम संजय पाटील (दोघीही रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. कोथरूड, पुणे) या दोघींनी साताऱ्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल १२ लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले. या डॉक्टरचे संबधीत खंडणी गोळा करणाऱ्या महिलेशी प्रेम संबंध जुळले होते. तसेच मोबाइल वरून ते दोघे एकमेकांना अश्लील व्हिडिओ कॉल करत होते. व्हिडिओ कॉल चालू असतानाच ती महिला त्याचा स्क्रीनशॉट काडून ते वायरल करण्याची धमकी देत डॉक्टर कडुन तब्बल 60 लाख रुपयांची मागणी केली.
वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने डॉक्टराने महिलेला 12 लाख रुपये दिले व बाकीचे पैसे परत देतो अस सांगितले. परंतु संबंधित महिलेने दवाखान्यात येऊन बदनामी करेन अशी धमकी दिल्याने अखेर डॉक्टरने पोलिसांकडे धाव घेतली.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अखेर पोलिसांनी सापळा रचून महिलेला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी आपला धाक्या दाखवताच महिलेने सर्व काही कबूल केलं. आपण त्या पैशातून दागिने घेतले असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली असून पोलिसांनी तिचे सर्व दागिने जप्त केले आहेत.
अनेक बड्या व्यक्तींचे नंबर
या महिलांच्या मोबाइलमध्ये अनेक बड्या हस्तींचे नंबर सेव्ह असून त्यामध्ये सातारा आणि पुण्यातील उद्योजक, महाविद्यालयीन युवक, डॉक्टर अशा लोकांचा समावेश आहे. या नंबरच्या आधारे पोलीस आता संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणार असून, ज्यांना या महिलांनी हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढले त्यांना पोलीस स्वत:हून तक्रार देण्यास प्रवृत्त करणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’