ट्रम्प यांच्या ‘त्या’ आरोपामुळे भर बैठकीतच दिला जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । जगभर पसरलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं चीन, जागतिक आरोग्य संघटना यांच्यावर आरोप करत आहे. ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेलाही या वादात ओढलं असून, संघटनेचे महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी व्हिडीओ कान्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या बैठकीत अचानक आपला राजीनामा दिला.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक व्यापार संघटेनेच्या विभागाप्रमुखांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रशासकीय मुद्यांवर जोर देण्यात आला. या बैठकीत चर्चा सुरू असताना अचानक महासंचालक रॉबर्टो अझेवेडो यांनी आपला राजीनामा सादर केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटना कोरोना काळात चीनला व्यापारासाठी जाणीवपूर्वक मदत करत असल्याचा आरोप करत लक्ष्य केलं आहे. “चीनला अप्रामाणिकपणे व्यापार करण्यास परवानगी दिली जात आहे,” असा आरोप ट्रम्प यांनी संघटनेवर केला. ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळेच अझेवेडो यांनी राजीनामा दिला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यानं, अझेवेडो हे संघटनेच्या जिनिव्हा येथील मंडळाचे महासंचालक आहेत. ते २०१३ पासून या पदावर कार्यरत होते. ते दुसऱ्यांदा पदावर काम करत होते. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार होता. अझेवेडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी नव्या नावाची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. संघटनेनं या विषयावर कोणतीही वाच्यता केलेली नाही. अमेरिकेत करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला चीन जबाबदार असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं करत आहे. यावरून त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवरही गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प पत्रकारावर संतापले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment