टीम इंडियाचा ‘हा’ हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, त्याच्या करियरमधील सगळ्यात वाईट कामगिरी

Team India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली सुरुवात करूनदेखील टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाला 217 रनवर ऑल आऊट केले. या मैदानावरील वातावरण बॉलिंगला मदत करणारे असले तरी भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा भारताला फक्त दोन विकेट मिळाल्या होत्या. भारताला मिळालेल्या या दोन्ही विकेट दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात मिळाल्या. आर. अश्विनने टॉम लेथमला तर इशांत शर्माने डेवॉन कॉनवेला आऊट केले.

यामध्ये टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहला एकसुद्धा विकेट घेता आली नाही. त्याने आतापर्यंत या सामन्यात 11 ओव्हरमध्ये 34 रन दिल्या, ज्यामुळे इंग्लंडला चांगली सुरुवात करता आली. 2021 हे वर्ष बुमराहसाठी फार काही खास ठरले नाही. या वर्षामध्ये त्याने 4 टेस्टमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यानेसुद्धा बुमराहच्या बॉलिंगवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

इंग्लंडमध्ये यशस्वी व्हायला आणि स्विंग मिळवण्यासाठी बॉल वरच्या लेन्थवर टाकणे गरजेचे आहे. पण सुरुवातीला अपयश आल्यानंतरदेखील बुमराहने त्याची रणनिती बदलली नाही असेदेखील लक्ष्मण म्हणाला. जसप्रीत बुमराहने 2021 साली 4 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 105.4 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याला 7 विकेट मिळाल्या. 84 रनवर 3 विकेट हि त्याची या वर्षीची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने टेस्ट पदार्पणानंतर पाचव्या इनिंगमध्येच 5 विकेट घेतल्या होत्या, पण यावर्षी त्याला एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट घेण्यात यश आले नाही.