उमेश कोल्हेंच्या हत्येत राणा दाम्पत्याचा हात यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीचं वातावरण खराब करण्यात राणा दाम्पत्याचा हात असल्याचा आरोप अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, असेदेखील यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. यशोमती ठाकूर यांनी यावेळी राणा दाम्पत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता होता, असा खळबळजनक दावा यशोमती ठाकूर यांच्याकडून करण्यात आला आहे. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

उमेश कोल्हे हत्याकांडातील मुख्य कथित सूत्रधार इरफान खान याचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालं आहे, असंदेखील यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. याचबरोबर हनुमान चालीसा पठनावरूनही माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्याकडून पब्लिसिटीसाठी सर्व गोष्टींचं राजकारण केलं जातं, असंसुद्धा यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

यादरम्यान यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष कधीही दहशतवादावर राजकारण करण्याच्या बाजूने नव्हता. मात्र आज जी परिस्थिती आहे त्यात एकापाठोपाठ एक घटनांमधून दहशतवादी आणि गुन्हेगार भाजपशी जोडले गेले आहेत. यावर प्रश्न विचारणं आवश्यक आहे. तुम्हीही विचार करा आणि समजून घ्या की, राष्ट्रवादाच्या नावाखाली भाजप देशाशी घृणास्पद खेळ करत आहे, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment