सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंत बँकेने ग्रीन फ्युचर ठेव योजनेत ठेव ठेवलेल्या ग्राहकाच्या अथवा त्याने सुचविलेल्या व्यक्तीच्या नावे वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. २१ जून २०२० रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत बँकेच्या सेवकांच्या ३ टीम करून येरावळे, शेडगेवाडी (विहे) व उरुल या गावी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वड, पिंपळ, आवळा, चिंच, कडूनिंब व जांभूळ या वृक्षांची लागवड करण्यात आली.
बँकेचे अध्यक्ष व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.शेखर चरेगांवकर यांनी वृक्षारोपणाच्या सर्व गावी भेट देवून स्वतः श्रमदान देखील केले. बँकेच्या ५० सेवकांनी यावेळी श्रमदान केले. स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी भविष्यात बँक विशेष लक्ष देणार आहे. बँकेचे अध्यक्ष मा.शेखर चरेगांवकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कराड शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक सदानंद कुलकर्णी व वरिष्ठ अधिकारी शंकर वीर यांनीया उपक्रमाचे प्रमुख म्हणून काम पहिले. यासाठी त्यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय डोईफोडे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैशाली मोकाशी यांचे विशेष सहाय्य लाभले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.