हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Yes Bank : RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. मात्र याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवर जास्त रिटर्नही देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता खाजगी क्षेत्रातील Yes Bank ने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 10 ऑगस्टपासून लागू झाली आहे.
Yes Bank च्या वेबसाइट वरील माहितीनुसार बँकेकडून 2 कोटींपेक्षा कमी डिपॉझिट्सवरील वेगवेगळ्या कालावधीसाठीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता बँकेकडून 7 दिवसांपासून ते 14 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3.25 टक्के व्याज दिले जाईल तर 15 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.10 टक्के आणि 3 महिने ते 6 महिन्यांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज दिले जाईल.
एक वर्षाच्या एफडीवरील व्याजही वाढले
Yes Bank कडून आता एक वर्ष ते 18 महिन्यांच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे, 18 महिने ते 3 वर्षे आणि 3 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरही 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे बँकेकडून ही वाढ करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त अतिरिक्त व्याज
Yes Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याज दिले जात आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, 7 दिवसांपासून ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर नियमित दराव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे, 3 वर्षे ते 10 वर्षांच्या FD वर नियमित व्याजाव्यतिरिक्त 0.75 टक्के अतिरिक्त रिटर्न दिला जात आहे. आजच्या वाढीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण व्याजदर 3.75 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुदती आधी पैसे काढल्यास जास्त दंड
Yes Bank कडून आता मुदती आधी एफडी बंद केल्यास जास्त दंड आकारला जाईल. 8 ऑगस्टपासून बँकेचे नवे पेनल्टी चार्जेस लागू झाले आहेत. या अंतर्गत, आता 181 दिवसांपेक्षा कमी मुदतीच्या FD च्या मुदतीपूर्वी काढण्यावर 0.50 टक्के दंड आकारला जाईल. त्याचप्रमाणे, 182 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर दंड आता 0.50 टक्क्यांवरून 0.75 टक्के करण्यात आला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, हा दंड 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या सर्व डिपॉझिट्सवर लागू होईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.yesbank.in/personal-banking/yes-individual/deposits/fixed-deposit
हे पण वाचा :
Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज
नितीशकुमार की पलटूसम्राट?? पहा आत्तापर्यंतच्या राजकीय कोलांट्याउड्या
फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर Rudi Koertzen यांचे निधन