हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | योगा हा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. असे आपण नेहमी ऐकत आलो आहे. योगासणामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. हे आपणाला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, तुमचा संधिवात सुद्धा हा योगामुळे दूर होऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहेत. संधीवात म्हणजे हाडांची झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आपण म्हणू शकतो. परंतु जर तुम्ही नियमितपणे काही योगासने केल्यास निश्चितपणे तुम्ही या संधीवातावर मात करू शकता. चला तर जाणून घेऊयात कोणती आहे ही योगासने?
१) बालासन :
ह्या आसनात तुमच्या मांडीवर आणि पाठीवर ताण पडून ते सांधेदुखीच्या दुखण्याला दूर करण्यासाठी प्रभावी आहे. ह्यामध्ये तुम्ही दोन्ही पायाची पालथी मांडी घालून पूर्णपणे खाली वाकावे आणि आणि दोन्ही हात जमिनीला लागतील अश्या आसनात यावे. हे जरी साधे आसन असले तरी हे सांधेदुखीसाठी अत्यंत प्रभावी आहे.
२) प्राणायाम:
प्राणायाम हा तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जितका फायदेशीर आहे तितकंच हे सांधे दुखीसाठी फायदेशीर आहे. संधिवातातील वेदना व्यवस्थापित करण्यात प्राणायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संधिवात-संबंधित तणावापासून आराम मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी साधे श्वास जागरूकता किंवा खोल उदर श्वास घेणे हे सहज सोपे आहे.
३) मत्स्येंद्रासन:
ह्या आसनात पाठीचा कणा ताठ ठेवत तो पाठीमागच्या दिशेने वळवला जातो. ज्यामुळे पाठीला ताण येतो. ज्यामुळे खांदे आणि मान यांना फायदा होतो. महत्त्वाचे म्हणजे, ह्यामुळे तुमचे शरीर हे किती लवचिक आहे ह्याची जाणीव होते. सांध्यावरील कोणताही अवाजवी ताण टाळण्यासाठी अर्ध मत्स्येंद्रासन संधिवात रूग्णांसाठी विशेषतः उपयुक्त आहे.
४) मार्जरियासन:
मार्जरियासन हे पाठीच्या लवचिकतेला प्रोत्साहन देते. ह्या आसनामुळे अनेक जणांना फायदा झाला आहे . ह्यामध्ये तुम्ही दोन्ही गुडघ्यावर येऊन दोन्ही हात जमिनीला लावून कमरेत थोडेसे वाकावे ज्यामुळे कमरेवरती ताण पडला जातो आणि गुडघ्याना तो फायदेशीर असतो. या गुंतागुंतीच्या हालचाली संधिवातात फायदेशीर ठरतात. अश्याप्रकारचे रोज व्यायाम करून तुम्ही घरबसल्या कोणतीही ट्रीटमेंट न घेता तुमचा संधिवात कमी करू शकता.